हॅरीस शिल्ड क्रिकेट स्पर्धा – श्री माँ विद्यालयाचा फिरकीपटू अद्विक मंडलिक याने ५ गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिल्याने तो सामनावीर ठरला.
मुंबई : शिवाजी पार्क येथे झालेल्या १६ वर्षांखालील हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय, ठाणे विरुद्ध डॉन बॉस्को स्कूल, माटुंगा (४५ षटके ) यांच्यात झालेल्या सामन्यात श्री माँ विद्यालय संघाने हा सामना तब्बल ९१ धावांनी जिंकला. श्री माँ विद्यालयाचा फिरकीपटू अद्विक मंडलिक याने ५ गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिल्याने तो सामनावीर ठरला. डॉन बॉस्को शाळेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
श्री माँ विद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना ४१ षटकांत सर्व बाद १५१ धावा केल्या. यात अथर्व सुर्वे नाबाद २६, अद्विक दुबे २२ आणि पार्थ देशमुख २० अशा धावा केल्या. ऋग्वेद सावंत याने ६ षटकांमध्ये १७ धावा देऊन ३ गडी बाद केले तर वेदांत चिली याने ७ षटकांमध्ये २३ धावा देऊन ३ गडी बाद केले.
त्यानंतर खेळण्यास उतरलेल्या डॉन बॉस्को स्कूलने श्री माँ विद्यालय संघाच्या १५१ धावांचा पाठलाग करताना २५ षटकांत सर्व बाद ५९ धावा केल्या. यात वेदांत साबळेने ११ धावा तर आर्यन चंद्रनने १०धावा केल्या. श्री माँ विद्यालयाच्या अद्विक मंडलिक याने १० षटकांमध्ये ४ निर्धाव षटके टाकून १९ धावांच्या बदल्यात ५ गडी बाद करून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्याला अद्विक दुबे (२ गडी ) आणि आदित्य कौलगी (१ गडी) बाद करून चांगली साथ दिली. अशाप्रकारे श्री माँ विद्यालयाच्या संघाने हा सामना ९१ धावांनी जिंकला.
17,828 total views, 2 views today