महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत करणार पुणे शहराचे प्रतिनिधित्व
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने फुलगाव, पुणे येथे होणाऱ्या ६६व्या माती व गादी राज्य अजिंक्य स्पर्धा व ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने मंगळवार पेठ येथील छत्रपती स्टेडियम येथे निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र केसरी गटात माती विभागातून पृथ्वीराज मोहोळ तर गादी विभागातून हर्षद कोकाटे यांनी विजय संपादन केला. हे दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या स्पर्धेवेळी राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त / अध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, गुलाबराव सोनावणे, हिंदकेसरी अभिजित कटके, उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड, राजाभाऊ मोहोळ, सरचिटणीस शिवाजीराव बुचडे, खजिनदार मधुकर फडतरे, सदस्य जयसिंग अण्णा पवार, अविनाश टकले, योगेश पवार, गणेश दांगट, सुनील देवकर, संभाजी आंग्रे, विकास दांगट, बाळासाहेब लोहकरे, रामदास माझिरे, कृष्णा बुचडे, माऊली मांगडे, सोमनाथ मोझे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :
माती विभाग
५७ किलो गट : अभिजित शेडगे (मामासाहेब मोहोळ), अभिषेक शिळीमकर (नगरकर तालीम)
६१ किलो गट : भालचंद्र कुंभार (हनुमान आखाडा), अनिकेत खेडकर (चिंचेची तालीम)
६५ किलो गट : विशाल थोरवे (आंतरराष्ट्रीय संकुल), सुदर्शन भोसले (मामासाहेब मोहोळ)
७० किलो गट : निखील कदम (शिवरामदादा तालीम), ओंकार शिंदे (नगरकर तालीम)
७४ किलो गट : अक्षय चव्हाण (शिवरामदादा तालीम), करण फुलमाळी (हनुमान आखाडा)
७९ किलो गट : आशुतोष भोंडवे (हनुमान आखाडा), प्रतिक वरपे (शिवरामदादा तालीम)
८६ किलो गट : अमित गायकवाड (गोकुळवस्ताद तालीम), ओंकार दगडे (हनुमान आखाडा)
९२ किलो गट : यशराज चोरमले (शिवरामदादा तालीम), अनिकेत कंधारे (हनुमान आखाडा)
९७ किलो : लौकिक सुर्वे (हनुमान आखाडा), अनिकेत वांजळे (हनुमान आखाडा)
महाराष्ट्र केसरी गट : पृथ्वीराज मोहोळ (खालकर तालीम), निलेश केदारी (हनुमान आखाडा)
गादी विभाग
५७ किलो गट : विजय मोझर (जयनाथ तालीम), उदयसिंह मोरे (मामासाहेब मोहोळ)
६१ किलो गट : कृष्णा राऊत (हनुमान आखाडा), ओंकार निगडे (मामासाहेब मोहोळ)
६५ किलो गट : सचिन दाताळ (मामासाहेब मोहोळ), अमोल पानसरे (नगरकर तालीम)
७० किलो गट : संकेत ठाकूर (सह्याद्री संकुल), शंतनू शेडगे (नगरकर तालीम)
७४ किलो गट : शुभम थोरात (शिवरामदादा तालीम), सुरज सावंत (आंतरराष्ट्रीय संकुल)
७९ किलो गट : वल्लभ शिंदे (खालकर तालीम), अविनाश गायकवाड (गोकुळवस्ताद तालीम)
८६ किलो गट : वैभव तांगडे (हनुमान आखाडा), कार्तिक धावडे (आंतरराष्ट्रीय संकुल)
९२ किलो गट : अभिजित भोईर (मामासाहेब मोहोळ), मंदार निघोट (खडकवासला तालीम)
९७ किलो गट : पंकज पवार (आंतरराष्ट्रीय संकुल), यशराज भिकुले (शिवरामदादा तालीम)
महाराष्ट्र केसरी गट : हर्षद कोकाटे (हनुमान आखाडा), आनंद मोहोळ (हनुमान आखाडा)
188 total views, 1 views today