ठाणे जिल्हा विभागीय आंतरशालेय टेबल टेनिस सांघिक स्पर्धा
ठाणे : ठाणे जिल्हा विभागीय टेबल टेनिस सांघिक स्पर्धा पिनॅकल टेबल टेनिस अकादमी येथे आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ब्राह्मण शिक्षण मंडळ संचालित इंग्लिश मीडियम शाळेने १७ वर्षांखालील गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. ब्राह्मण शिक्षण मंडळ संचालित इंग्लिश मीडियम शाळा, घंटाळी, ठाणे या शाळेने अंबरनाथ शाळेचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. उपांत्य फेरीत मुंबई शहरावर ३-१ असा विजय मिळवला. अंतिम फेरी ब्राम्हण शिक्षण मंडळ संघ ठाणे व नवी मुंबई शाळे विरुद्ध झाली. या स्पर्धेत ब्राम्हण शिक्षण मंडळ ठाणे संघाने ३-२ असा नवी मुंबई झोन शाळेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. जिल्हा स्तरावर सुवर्णपदकानंतर झोनमध्ये परत सुवर्णपदक आल्याने हा खरोखरच अभिमानाचा क्षण होता. या विजयाबद्दल उदित सचदेव, ओम गायकवाड, दिनेश चौधरी आणि मयंक लोंढे यांच्यासह क्रीडा शिक्षक साहिल वारेकर व इतर शिक्षक यांचे अभिनंदन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ब्राम्हण शिक्षण मंडळ संस्थेच्या अध्यक्षा नमिता सोमण, उपाध्यक्ष श्रीराम देव, चिटणीस केदार जोशी, खजिनदार सुभाष लिमये आणि इतर विश्वस्त यांचे नेहेमीच प्रोत्साहन मिळत असते.
13,902 total views, 1 views today