एसटी बँक संचालक पदासाठी मनेश सोनकांबळे प्रबळ उमेदवार

  

मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या संचालकांचा इतकी वर्षे सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला एसटी कर्मचारी कंटाळले आहेत,कर्मचाऱ्यांना बँक संचालक पदाच्या निवडणुकीत बदल हवा असुन ठाण्यातील मनेश सोनकांबळे हा एक उत्तम पर्याय – सचिन शिंदे

ठाणे : २३ जुन रोजी एसटी को आँपरेटिव्ह बँक संचालक पदासाठी राज्यभर पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होत आहे.ठाणे विभागाच्या एसटी इंटक युनियन चं प्रभावी नेतृत्व करणारे युवा व अभ्यासू एसटी कर्मचारी मनेश सोनकांबळे हे संचालक पदाच्या निवडणुक रिंगणात उतरले आहेत.
मनेश सोनकांबळे हे उच्चशिक्षित आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास,व ते निर्भिडपणे मांडण्याची धमक मनेश सोनकांबळे यांच्या त असुन ठाणे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज्यभरातील कर्मचाऱ्यांना ही ते सुपरिचित आहेत ,त्यामुळे हा युवा चेहरा  संचालक पदाच्या निवडणुकीत निश्चितच बाजी मारेल यात शंका नाही असे उदगार  ठाणे एसटी इंटकचे विभागीय अध्यक्ष तथा ठाणे शहर काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी इंटक कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना काढले.
मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या संचालकांचा इतकी वर्षे सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला एसटी कर्मचारी कंटाळले आहेत,कर्मचाऱ्यांना बँक संचालक पदाच्या निवडणुकीत बदल हवा असुन ठाण्यातील मनेश सोनकांबळे हा एक उत्तम चेहरा इंटक युनियन च्या परिवर्तन पँनल कडुन उभा आहे.
इंटक युनियनने राज्यातील सर्व मतदार संघात सक्षम व प्रभावी उमेदवार सरचिटणीस मुकेश तिगोटे यांच्या नेतृत्वाखाली उभे केलेले आहेत ते सर्वजण मोठ्या फरकाने निवडुन येतील असा विश्वास आपल्या भाषणात सचिन शिंदे यांनी व्यक्त केला.
ठाणे शहर काँग्रेस कार्यालयात नुकतीच सचिन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग संपन्न झाली.३१ मे रोजी एसटी सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कट्टर इंटक सभासदाचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी विभागाचे सेक्रेटरी शामराव भोईर,कार्याध्यक्ष विजय तारमळे, राज्य कार्यकारिणी चे शांताराम पाटील,आदि पदाधिकारी उपस्थित होते .
राज्यात उभे असणारे इंटकचे परिवर्तन पँनल चे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी इंटकच्या ठाणे विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे,जोमात प्रचार करावा असे आवाहनही सचिन शिंदे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

 402,363 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.