नक्षलग्रस्त गोंदिया जिल्हातील आदिवासी विद्यार्थांनी घेतला चित्रिकरणाचा आनंद

दादासाहेब फाळके चित्रनगरीतील प्रत्यक्ष चित्रिकरण, मालिका सेट,आणि कलाकारांना  भेटून भारावले विद्यार्थी
व्यवस्थाकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी विद्यार्थाचे  स्वागत करत ; पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा

मुबई : नक्षलप्रभाव असलेल्या गोंदिया जिल्हातल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समूहाने बुधवारी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रगरीत सुरु असलेल्या चित्रिकरणाचा प्रत्येक्ष आनंद घेतला. प्रत्येक्ष चित्रिकरणांसह, मालिकांचे सेट,आणि कलाकारांना भेटून हे सर्व विद्यार्थी भारावून गेले. दरम्यान महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी या विद्यार्थाचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्य शासनामार्फत नक्षल प्रभावित जिल्हामधील किशोरवयीन मुला-मुलींच्या उन्नतीसाठी “आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना” राबवली जाते. या योजनेतर्गत गोंदिया जिल्हातील १४ ते १८ वयोगटातील मुला-मुलीच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांच्या मनातील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होण्यासाठी, त्यांना महाराष्ट्र राज्याची औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, व शैक्षणिक प्रगतीची माहिती व्हावी, या दृष्टीने गोंदिया पोलीस विभागामार्फत मुंबई दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. 
या सहलीनिमित्ताने आलेल्या विद्यार्थ्यांना चित्रनगरीतील तारक मेहता का उलटा चष्मा आणि द कपिल शर्मा शो चा सेट दाखविण्यात आला.   त्याचबरोबर सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेचे प्रत्येक्ष चित्रिकरण आणि मालिकेतील कलाकारांनां भेटण्याची, त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्वच विद्यार्थी भारावून गेले होते. यावेळी व्यवस्थापकीय कलागरे विजय भालेराव, उप व्यवस्थापकीय कलागरे मोहन शर्मा आणि गोंदिया पोलीस विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 18,527 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.