देशामध्ये पहिल्यांदाच ग्राफाईट धातूने बनवलेल्या आकर्षक स्पर्धा चषकाचे शानदार अनावरण
नवीमुंबई : नवी मुंबई प्रीमियर लीग अर्थात एनएमपीएल स्पर्धेच्या चौथ्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया एका दिमाखदार सोहळ्यात पार पडली. या स्पर्धेच्या आकर्षक अशा चषकाचे अनावरण ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार आणि या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते संदीप गणेश नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
नविमुंबई क्रिकेट विश्वात एनएमपीएल स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जाते. ही स्पर्धा पुढील वर्षी ६ ते ८ जानेवारी या कालावधीमध्ये नवी मुंबई कोपरखैरणे येथील भूमिपुत्र मैदानामध्ये रंगणार आहे.
याप्रसंगी आपले विचार मांडताना संदीप नाईक यांनी एनएमपीएल स्पर्धेने वेगळी उंची गाठल्याचे नमूद केले. स्पर्धेच्या आयोजकांनी आणि त्यासाठी समर्पित भावनेने झटणाऱ्या सर्वांच्या योगदानातून आतापर्यंत या स्पर्धेचे तीन हंगाम यशस्वी झाले आहेत. खासकरून तिसरे पर्व हे आव्हानात्मक होते. कोरोनाचा कठीण काळ होता. आणि अशा परिस्थितीतही नकारात्मक विचारांच्या वातावरणात सकारात्मक विचार करून एनएमपीएल स्पर्धा सर्व नियम पाळून यशस्वीपणे पार पडली. त्यावेळी या स्पर्धेने सर्वांमध्ये एक वेगळा उत्साह, उमेद जागवली. ही बाब संदीप नाईक यांनी आवर्जून नमूद केली. भारतामध्ये क्रिकेट हा सर्वांना जोडणारा खेळ आहे. एनएमपीएल स्पर्धेने नवी मुंबईकरांना जोडले आहे, असे मत त्यांनी मांडल. एनएमपी एल प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये अनेक सरप्राईजेस असून या स्पर्धेचा बक्षीस समारंभ देखील आगळावेगळा असेल अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमात ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे एनएमपीएल कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा संदीप नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संघ मालकांचा देखील गौरव करण्यात आला.
खेळाडू लिलाव प्रक्रियेचे सूत्रसंचालन नावाजलेले समालोचक कुणाल दाते यांनी केले. नगरसेवक लीलाधर नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. एनएमपीएल चे कमिशनर दीपक पाटील, एनएमपीएल कमिटीचे सदस्य स्वप्निल नाईक ,ओमकार नाईक, टोनी मढवी, उमेश म्हात्रे ,मस्कर ,भूषण पाटील, मनोज ,प्रतीक पाटील ,महेंद्र पाटील ,निलेश पाटील ,अजिंक्य पाटील, चेतन पाटील, रमेश मढवी, पंच विजय पाटील, रवी म्हात्रे, भिकाजी मोकल, माजीद बलोच, तुषार पाटील, विकास मोकल, एल. डी. पाटील, मनोज म्हात्रे, ऋषिकेश वैद्य, योगेश वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
एनएमपीएल लिलाव प्रक्रिया कार्यक्रमात
संदीप नाईक यांच्या हस्ते नवी मुंबई रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला. यामध्ये फोर्टी प्लस क्रिकेट फॉरमॅटची जगाला ओळख करून देणारे मास्टर प्रदीप पाटील, आगरी-कोळी बांधवांची संस्कृती संपूर्ण विश्वात कलेच्या माध्यमातून वाढविणारे कलाकार नंदकुमार म्हात्रे, आयपीएल मधील रॉयल चॅलेंज बंगळुरू संघाचे फिजिओथेरपिस्ट रमेश माने, खोखो आणि कबड्डीपटू रमेश यादव आणि शक्ती सिंग या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
नवी मुंबई प्रीमियर लीगचे स्वप्न सत्यामध्ये आणणारे या स्पर्धेचे आधारस्तंभ या स्पर्धेला बळ देणारे संदीप नाईक यांना बाहुबली पुरस्कार देऊन एनएमपीएल समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
कुकशेत अवेंजर्स, पार्थ रॉयल बोनकोडे, वाशी इंडियन्स, परी इलेव्हन, वन सोल्युशन करावे ,वरद लॉजिस्टिक, साईप्रसाद गोठवली, अथर्व चॅलेंजर्स सानपाडा ,शिरवणे प्रतिष्ठान, इच्छापूर्ती वाशी गाव ,टोनी टायटन्स, जय मल्हार फायटर्स, एमपी वॉरियर्स कोपरखैरणे, टायटन नवी मुंबई, डी. आर. पाटील वॉरियर्स, किरण इलेव्हन शिरवणे आदी संघ विजेतेपदासाठी लढतील. एनएमपीएल स्पर्धा विजेत्यांसाठी घडविलेला यंदाचा स्पर्धा चषक हा भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचा चषक असून तो ग्राफाईट धातूने तयार केलेला अत्यंत कमी वजनाचा आहे. खेळाडू लिलाव कार्यक्रमात अतिशय आकर्षक पद्धतीने सर्वांना भुरळ घालणाऱ्या या स्पर्धा चषकाचे अनावरण करण्यात आले. एनएमपीएल स्पर्धेसाठी एकूण ६२४ खेळाडूंचा लिलाव पार पडला. यापैकी २४० खेळाडूंवर बोली लावून संघमालकांनी त्यांना आपल्या संघासाठी निवडले. स्पर्धेमध्ये सोळा संघ अजिंक्यपदासाठी लढणार आहेत.
263 total views, 1 views today