इनडोअर क्रिकेट : पुरुष गटात भारताने पाच पैकी चार लढती जिंकल्या. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी.
सिडनी : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (WICF) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताने श्रीलंकेवर १२ धावांनी पराभव करून निसटता विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात भारताने फलंदाजी करताना १६ षटकात १०५ धावा केल्या तर श्रीलंकेने ९३ धावा करताना जोरदार लढत दिली.
१६ षटकांच्या सामन्यात भारताच्या सलामवीरांनी आजही चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे २१, २४, २३ व ३८ धावा करत एकूण १०५ धावा करत मजबूत स्थिति मिळवली. भारताच्या शेवटच्या जोडीनेही जोरदार फटकेबाजी करत भारताला शंभरी पार करून दिली. तर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २१, २५, ३१ व १६ धावांवर रोखल. आजच्या सामन्यात श्रीलंकेने भारताला जोरदार लढत दिली मात्र भारताने १२ धावांनी विजय साजरा केला. भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकात श्रीलंकेचे एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने श्रीलंकेच्या धावाफलकतून २५ धावा कमी करता आल्या तर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही १६ षटकात भारताचे एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या धावाफलकतून सुध्दा २५ धावा कमी झाल्या. एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय चांगले झाले त्यामुळेच कडव्या प्रतिकारनंतर सुध्दा भारताला विजय प्राप्त करता आला. विशेष म्हणजे शेवटच्या जोडीने केलेल्या फटकेबाजीनेच भारताचा विजय सुकर झाला.
भारता तर्फे पहिल्या जोडीने धनुश भास्कर (८) व दैविक राय (१३) यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरवतींनंतर दुसऱ्याच्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१२) व अफ्रोज पाशा (१२), तिसऱ्या जोडीतील सुरज रेड्डी (१६) व अरिज अजीज (६) व चौथ्या व शेवटच्या जोडीतील नामशीद व्हि. (१३) व मोहसिन नादाम्मल (२५) यांनी भारतासाठी जोरदार कामगिरीची नोंद केली.
श्रीलंकेच्या पहिल्या जोडीमधील निलंथा वीजेकून (१९) व एंडी सोलोमोंस (२), दुसऱ्या जोडीमधील रुमेश पेरेरा (१०) व चंडिमा अबेकूण (१५), तिसऱ्या जोडीतील कोलिथा हापूयाराच्ची (१०), व मालशान रोड्रिगो (२१) तर शेवटच्या जोडीतील निलोचना पेरेरा (९) व दासून रंदिका (७) यांनी कडवी लढत दिली.
भारताच्या नामशीद व्हि. २, धनुश भास्कर, अफ्रोज पाशा व सूरज रेड्डीने यांनी प्रत्येकी एक एक फलंदाज बाद केला तर श्रीलंकेच्या निलंथा वीजेकूनने ३ व मालशान रोड्रिगो, दासून रंदिका यांनी प्रत्येकी एक एक फलंदाज बाद केला.
या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार श्रीलंकेच्या निलंथा वीजेकून देऊन गौरवण्यात आले. भारताच्या २२ वर्षाखालील मुलांच्या संघाने सुध्दा दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजय मिळवला.
279 total views, 1 views today