महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी निलेश वैती

  • शहर संघटक पदावर संदीप चव्हाण, प्रमोद पताडे यांची वर्णी 

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदी निलेश वैती यांची नेमणूक करण्यात आली. तर संघटनेचे शहर संघटक म्हणून संदीप चव्हाण व प्रमोद पताडे यांची नियुक्ती करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या नियुक्तीचे पत्र सादर केले. त्यामुळे लवकरच शहरातील मनसे विद्यार्थी संघटनेच्या इतर नेमणुकाही जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची सूत्र अमित ठाकरे यांनी हाती घेतल्यानंतर विद्यार्थी संघटनेत आमूलाग्र बदल करण्यास सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात प्रदेश कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचंगे यांनी इतर पदाधिकाऱ्यांसह ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला. महिन्याभरापूर्वी अमित ठाकरे यांनी ठाण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. अखेर ठाणे शहरातील मनविसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यामध्ये रामचंद्रनगर येथील जतन गोविंदा पथकाचे संस्थापक निलेश वैती यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर मनविसे ठाणे उप शहर अध्यक्ष प्रमोद पताडे यांना ठाणे शहर व कळवा – मुंब्रा विधानसभेच्या शहर संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली. यासोबतच मनविसे ठाणे उप शहर अध्यक्ष संदीप चव्हाण यांना कोपरी – पाचपाखाडी व ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघाची धुरा सोपवण्यात आली..

तासाभरात यादी बदलली
सुरवातीला अमित ठाकरे यांची स्वाक्षरी नसलेली मनविसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची यादी ठाण्यात सोशल मीडियावर चांगलीच वायरल झाली. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात येताच पुन्हा एकदा सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आली. या नियुक्ती पत्रावर आधीच्या कार्यकारिणीतील तसेच आधीच्या यादीतील नावे नसल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

 44,107 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.