ठाणे पोलिस आयुक्तलाय क्षेत्रात एक हजार अंबे मातेची होणार प्राणप्रतिष्ठापना

ठाण्यात दोन तर भिवंडीत एका ठिकाणी रंगणार रामलीला

ठाणे : कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे नवरात्रोत्सवाचा उत्साह वाढला असून गुलाल, पुâले उधळत, वाजत गाजत, भव्य मिरवणुका काढत ठिकठिकाणी देवीचे ठिकठिकाणी रविवारी आगमन झाले. ठाणे पोलिस आयुक्तालय परिमंडळामध्ये यंदा — मुर्ती, — प्रतिमा आणि — घटांची स्थापना होणार असून सोमवारी विधिवत एक हजार अंबे मातेची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.
भक्तांच्या हाकेला धावणारी आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. यामध्ये प्रमुख आकर्षण आहे ते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवारोत्रोत्सवाचे. प्रसन्न मुद्रा असलेली आई जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी यावर्षीही लाखो भाविक येथे गर्दी करणार आहेत. देवीच्या बैठकीसाठी शिखर मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली असून आतापासूनच परिसराला जत्रेचे रुप येऊ लागले आहे. नऊ दिवस येथे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. दुसरे आकर्षण म्हणजे कल्याणच्या दुर्गाडी देवीचे. यंदा येथेही मोठया उत्साहात देवीचा जागर करण्यासाचे आयोजन आहे. याशिवाय ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये छोटी- मोठी मंडळेही सज्ज झाली असून आकर्षक रोषणाई आणि सजावटींनी सार्वजनिक मंडपे सजली आहेत. तर दुसरीकडे शेकडो ठाणेकराच्या घरी देवी, घट स्थापना होणार आहे. नवरात्रोत्सवात रामलीला हेही प्रमुख आकर्षण असते. ठाण्यात दोन तर भिवंडीमध्ये एका ठिकाणी रामलीलाचे आयोजन करण्यात आले आहे.

 26,380 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.