एक महिन्यांपूर्वी हरवलेल्या सूरज पालचा शोध कधी लागणार,पाल कुटुंबियांचा पोलिसांना सवाल

ठाणे दि : नवी मुंबई ,रबाले येथे राहणारा सूरज पाल हा १२ वर्षीय मुलगा हरवला आहे.परंतु एक महीना उलटला तरी असूनही सूरज सापडला नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली असून पोलिस सूरजचा शोध कधी लावणार असा सवाल कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई ,रबाले येथील कातकरी पाडा,भीमनगर येथे राहणारा सूरज पाल हा मुलगा २० ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी आईला मित्रांबरोबर खेळायला जातो असे सांगून घराबाहेर पडला परंतु तो परत घरी न आल्याने सूरजची आई संगीता पाल यांनी रबाले पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.परंतु एक महीना उलटला तरी असूनही सूरज सापडला नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली असून पोलिसांनी लवकरात लवकर सुराजचा शोध द्यावा अशी मागणी सूरजच्या कुटुंबियांनी केली आहे .

सुरज पाल याचे वय १२ वर्षे असून उंची 4 फुट, रंग-गोरा, केस काळे लांब, नाक-सरळ, डोळे-काळे, उजव्या हाताच्या दंडावर तिळ, अंगात आकाशी रंगाचे महानगरपालिकेच्या शाळेचे शर्ट, काळ्या रंगाची ट्रेक पॅन्ट, पायात काळ्या रंगाची परेगॉन चप्पल, भाषा-हिंदी असे त्याचे वर्णन असून आशा वर्णनाचा मुलगा कोणाला सापडल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये किवा 7400113328,8108299217, 7738974826,7678008238 या नंबरवर संपर्क करावा असे आव्हान सूरज पाल यांच्या नातेवाईकांनी केले आहे.

 212,315 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.