समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारणार

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे

ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत

समुद्रकिनारी पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर आपत्कालिन आढावा बैठक आयोजित केली. राज्याचे मुख्य सचिव आपत्कालिन विभागाचे अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे वर्षा बंगल्यावर उपस्थित आहेत. 

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका आहे अशा ठिकाणी संरक्षण भिंत उभारणार आहेत. समुद्रकिनारपट्टी  पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी संरक्षण भिंत उभारली जाणार आहे.  समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरू नये व अघटित घटना घडू नये तसेच शेत जमीन समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणार आहे. पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास १७१ किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास १६०० कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या ५ जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी सलग तीन दिवस पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तुफान पावसाने हाहाकार माजवल्याने राज्याच्या अनेक भागात मोठं नुकसान झालं आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूण, सातारा इथेही दरड दुर्घटना घडल्या. मुख्यमंत्र्यांनी रायगड आणि चिपळूणचा दौरा केला. त्यानंतर आज मुख्यमंत्री साताऱ्यातील कोयना नगरला जात होते. मात्र तुफान पावसामुळे हेलिकॉप्टर लँड होऊ शकत नसल्याने, मुख्यमंत्री परत पुण्याला आले. तिथून ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगल्यावर आपत्कालिन बैठक आयोजित केली.

 387 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.