घनदाट जंगलात अथक परिश्रम करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीज पुरवठा पूर्ववत   

मनोर – युद्धस्तरावर काम करून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मनोर आणि विक्रमगड परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीत झालेला बिघाड दुरुस्त केला. दऱ्याखोऱ्यात आणि घनदाट जंगलात अथक परिश्रम करत कर्मचाऱ्यांनी बाधित भागाचा वीजपुरवठा पूर्ववत केला.

मनोर आणि विक्रमगड परिसराला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी (फिडर) पालघरहून आलेली आहे. या वीजवाहिनीतील एक तार सोमवारी रात्री देवखोप ते कोकणेर दरम्यान घनदाट जंगल आणि पर्वताच्या माथ्यावर तुटून पडली. मध्यरात्रीच्या सुमारास हा बिघाड शोधण्यात यश आले. नैसर्गिक परिस्थितीच्या मर्यादेमुळे रात्रीच तयारी करून भल्या पहाटे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यात महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कर्मचारी सहभागी होते. अथकपणे काम करून मंगळवारी सकाळी साडेअकरा दरम्यान मनोर उपकेंद्रावरील ढेकाळे, दहिसर, मनोर, भोपोली, मासवण, बहाडोली तसेच विक्रमगड उपकेंद्रावरील साखरा, ओंडा व विक्रमगडचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

 473 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.