आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्धन संगम यांचे आकस्मिक निधन

२७ वर्ष सांभाळली राज्य संघटनेच्या संयुक्त सचिवपदाची जबाबदारी

मुंबई : आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे माजी संयुक्त सचिव जनार्धन संगम यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांनी खेळाडू म्हणून नेव्हल डॉकयार्डचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु नंतर खेळापेक्षा संघटनेत काम करण्यास त्यांनी अधिक पसंती दिली. अनेक राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी कधी पंच व प्रमुख पंच म्हणून तर कधी तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले होते. सन १९९२ ते २०१९ जवळपास २७ वर्षे ते महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या कार्यकारिणीवर संयुक्त सचिव म्हणून काम करत होते. त्यापेक्षाही वृत्तपत्राद्वारे व क्रीडा वाहिन्यांद्वारे खेळाच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. मीत भाषी स्वभावामुळे सर्व पत्रकारांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे कॅरमचे फार मोठे नुकसान झाले असून आम्ही एका चांगल्या कार्यकर्त्याला मुकलो असल्याचे महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष अरुण केदार यांनी सांगितले. संगम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

 559 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.