ग्रामीण भागात नकली उत्पादनांचा सुळसुळाट

पोलिसांच्या मदतीने पालघरमध्ये छापेमारी

दोषींविरोधात एफआयआर दाखल

ठाणे : नकली उत्पादन बनविणाऱ्या टोळीनी आपले बस्तान आता ग्रामीण भागात वसविल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने २६ फेब्रुवारी २०२० रोजी महाराष्ट्रातील जिल्ह्यातील वसई भागातील ‘ए वन स्टील ट्रेडर्स’ या रिटेल दुकानावर छापा घालण्यात आला. घातलेल्या छाप्यात असे आढळून आले की याठिकाणी नकली ‘टाटा वायरॉन’ उत्पादने विकली जात होती. या दुकानामध्ये नकली काटेरी वायरवर टाटा वायरॉनची फोटोकॉपी केलेली लेबल्स लावून ती विकली जात होती. सदर दुकानदार जवळच्या जिल्ह्यातील उत्पादकांनी बनवलेल्या वस्तू आणून त्याच्या दुकानामध्ये त्यावर फोटोकॉपी केलेली लेबल्स लावत असे असा प्रकार सुरू असल्याची तक्रार तट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली होती त्या आधारे ही छापेमारी करण्यात आली.

पोलिसांच्या साहाय्याने टाटा स्टीलच्या टीमने या छाप्यामध्ये नकली उत्पादनांची जवळपास २६ बंडल्स हस्तगत केली. टाटा वायरॉन काटेरी वायर या खऱ्या उत्पादनाच्या मूळ किमतीच्या तुलनेत अतिशय कमी किमतीत हे नकली उत्पादन विकले जात होते. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. एखाद्या ब्रँडची प्रतिष्ठा मलीन करणाऱ्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांच्या विरोधात कार्यवाही करण्याचे प्रयत्न अनेक कंपन्यांनी सुरू केले आहे. आपले ट्रेडमार्क्स, लोगो आणि इतर बौद्धिक संपत्ती यांच्या गैर आणि बेकायदेशीर वापर करणे गुन्हा असूनही ग्रामीण भागात मात्र नकली वस्तू आणि उत्पादने आढळून येतात. त्यामुळे या कारवाईमुळे ग्रामीण भागातील नकली नकली वस्तू विकणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.

 687 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.