अंगणवाडी सेविकांचे टाळनाद-भजन आंदोलन

विविध मागण्यांसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मारली धडक

ठाणे : ठाणे जिल्ह्यात काम करणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांचे दैनंदिन प्रश्‍न प्रश्न महिला व बाल विकास कार्यालयाने न सोडविल्याने अंगणवाडी कर्मचार्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. तसेच अंगणवाडी कर्मचार्‍यांना शायकीय कर्मचार्‍याचा दर्जा देवून, तृतिय व चतुर्थ श्रेणीचे वेतन भत्ते देण्यात यावे यासह आदी मागण्यांसाठी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टाळनाद भजन मोर्चाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाविकास आधाडीने सरकारने अंगणवाडी कर्मचपांच्या सेवाश्ीत सुधारगा व त्यांच्या मानधनात वाढ करण्यासंवंधी समान किमान कार्यक्रमामध्ये लेखी आश्वासन दिलेले आहे, अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात तातडीने वाढ करावी, अशी अंगणवाडी कर्मचार्‍यांची मागणी आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांना त्यांना सेवासमाप्तीच्या दिवशी मिळत असलेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याचे नियम तयार करण्यात यावे, तसेच अंगणवाडी कर्मचार्‍यांना इतर शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे भरपगारी आजारपणाची रजा देण्यात यावी. आदिवासी प्रकल्यापातील लाभार्थ्यांना अमृत आहार योजनेतर्गत जेवण व अंडी, केळी देण्याची जवावदारी अंगणवाडी कर्मचार्‍यांवर सोण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यापासून अंगणवाडी कर्मचा-यांनी स्वतःच्या खर्चने लाभार्थ्यांना अमृत आहार योजनेचे लाभ दिले आहेत, परंतु, ठाणे जिल्हा परिषदेने आजपर्यंत त्याचे थकित पैसे न दिल्यामुळे, अंगणवाडी कर्मचा-यांची आर्थिक कोंडी होत आहे, थकित पैसे त्वरीत कर्मचार्‍यांना देण्यात यावे अशी कर्मचार्‍यांची मागणी आहे. अंगणवाडी केंद्रातील ३ ते ६ योगटातील लाभार्थ्यांना दोन वेळचा ताजा गरम दिला जातो. ते पैसे सुष्दा गेल्या सहा महिन्यापासून दिलेले नाहीत, अनेक वर्षापासून रिक्त असलेल्या सेविका, मदतनिसांच्या जागा त्वरीत भरण्याचे व पात्र मदतनिसांना सेविकेच्या पदावर थेट नियुक्ती करण्यात यावी, सोमवार २४ फेब्रुवारीपासून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे शासनाचे ला वेधून घेण्यासाठी व जिल्हातील कर्मचा-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे ठाणे जिल्हातील हजारो अंगणवाडी कर्मचार्‍यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिाकरी कार्यालयाबाहेर टाळनाद भजन धरणे आंदोलन करण्यात आले असून यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी दिली.

 601 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.