अक्षय मोगरकर “ठाणे जिल्हा श्री” चा मानकरी

आठ गटात २०० हुन अधिक शरीरसौष्ठवपटूनचा सहभाग


बदलापूर : राजेंद्र घोरपडे प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि बदलापूर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीच्या अक्षय मोगरकर याने 85 किलो वजनी गट आणि संपूर्ण स्पर्धेतुन पहिला येण्याचा मान मिळवत “ठाणे जिल्हा श्री” हा किताब पटकावला आहे.
ठाणे जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषद व भाजपाचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्या राजेंद्र घोरपडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध आठ गटात झालेल्या स्पर्धेत सुमारे दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन या स्पर्धेत रंगत वाढवली.
भाजपाचे गटनेते राजेंद्र घोरपडे व दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांच्या हस्ते अक्षय मोगरकर याला पुरस्कार, मानचिन्ह व रोख बक्षीस देण्यात आले. उमेश गुप्ता याला बेस्ट इम्प्रुमेंट बॉडीबिल्डर या किताबाने गौरवण्यात आले. संग्राम ढाले याचा बेस्ट पोझर म्हणून गौरव करण्यात आला. खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे, उपनगराध्यक्षा राजश्री घोरपडे, भाजपचे शहर अध्यक्ष नगरसेवक संजय भोईर, नगरसेवक प्रशांत कुलकर्णी, किरण भोईर, किरण बावस्कर यांच्यासह विविध मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 301 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.