कल्याण – कल्याण शहरातील भाषाप्रभु राम गणेश गडकरी कट्टयातर्फे फेसबुक ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या भाषाप्रभु राम गणेश गडकरी व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शब्द सुमनांजली या कार्यक्रमाचा सुमारे तीन हजारांहून अधिक श्रोत्यांनी घेतला.
कल्याणमधील राम गणेश गडकरी कट्टा गेली काही वर्षे हा उपक्रम राबवित आहे. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे फेसबुक ऑनलाईन पध्दतीने सदरचे कार्यक्रम होत आहेत. यावर्षी राम गणेश गडकरी यांच्यावर प्रा. डॉ. विमुक्ता राजे व स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वृत्तनिवेदक दीपक पळसुले यांचा फेसबुक ऑनलाईन कार्यक्रम झाला. या कार्यव्रâमाचा संपूर्ण महाराष्ट्रातून तीन हजारांहून अधिक श्रोत्यांनी लाभ घेतला.
वाचन संस्कृती वाढावी तसेच स्वातंत्र्यवीर, नाटककार, लेखक इत्यांदी महनिय व्यक्तींचा इतिहास नव्या पिढीसमोर योग्य पध्दतीने मांडला जावा म्हणून राम गणेश गडकरी कट्टयातर्फे अनेक उपक्रम राबविले जातात व त्याला नागरीकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. राम गणेश गडकरी कट्ट्याने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी फेसबुकवरील राम गणेश गडकरी पेजला लाईक करण्याचे आवाहन गडकरी कट्टयातर्फे अभिनेत्री व वृत्तनिवेदक अनुश्री फडणीस यांनी केले आहे.
524 total views, 1 views today