मराठी आपली मायबोली असून तिच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केडीएमसीमध्ये केले पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन

कल्याण :  “माझी मराठीची बोलु कौतुके परि आमुतातेहि पैजासी जिंके ऐसी  अक्षरे मेळविन “असा  संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मराठी भाषेबद्दलचा उक्ती प्रमाणे क.डो.मपा. माध्यमातून सुरू असलेल्या मराठी भाषा संवर्धन  पंधरवडा कार्यक्रमास लाभणारा समाजातील सर्वच स्तरातील वर्गात मिळत आहे. मराठी आपली मायबोली असून तिच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भरविलेल्या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनासमयी त्यांनी हे उद्गार काढले.
 मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त महापालिकेने आयोजिलेल्या पुस्तक प्रदर्शनात अनेक प्रकाशकांनी हिरीहिरीने भाग घेतला असून या प्रदर्शनात अनेक दुर्मिळ पुस्तके ठेवलेली दिसून येतात तरी, जास्तीत जास्त नागरीकांनी, वाचकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अनेक विविध उपक्रम राबविलेले असून यामध्ये बुधवार २० व  गुरूवार२१ जानेवारी रोजी कल्याण मुख्यालयाच्या प्रांगणात‍ आणि २३ व २४ जानेवारी रोजी डोंबिवली विभागिय कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात, मॅजेस्टीक प्रकाशन, नवनीत प्रकाशन, मेहता प्रकाशन आदी ख्यातनाम प्रकाशकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात कल्याण मधील १५६ वर्षे जुन्या सार्वजनिक वाचनालयाने आपल्याकडील दुर्मिळ पुस्तके वाचकांच्या अवलोकनासाठी ठेवली आहेत.
कोविड- १९ च्या साथीत ग्रंथालये बंद असल्यामुळे वाचन संस्कृतीला खीळ बसली होती. त्यामुळे ऐतिहासिक, ललित ,धार्मिक, अनुवादीत, नाटयविषयक, विज्ञानविषयक अशा विविध प्रकारातील पुस्तकांचे प्रदर्शन प्रथमत: महानगरपालिकेने मराठी भाषा पंधरवडा च्या निमित्ताने  आयोजिलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालिका आयुक्त यांचे हस्ते झाल्यावर, प्रदर्शनातील जास्तीत जास्त पुस्तके विकत घेणा-या व्यक्तींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या उद्घाटना समयी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार , उपायुक्त पल्लवी भागवत, रामदास कोकरे,जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव,कर निर्धारक संकलक विनय कुलकर्णी, सहा.आयुक्त अरुण वानखेडे,सुहास गुप्ते तसेच सहा.जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, अत्रे रंगमंदिराचे माणिक शिंदे, सावित्रीबाई नाट्यगृहाचे दत्तात्रय लदवा, सरस्वती ग्रंथ भंडाराचे मनोज संत, सार्वजनिक वाचनालय कल्याणचे राजीव जोशी, फ्रेन्डस लायब्ररीचे श्री.पै,पपायरसचे भूषण कोलते व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच काही नागरिकांनी १२००,१५०० रक्कमेची पुस्तके खरेदी करुन प्रदर्शनास उत्साही प्रतिसाद दिला. स्वत: महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना देवनपल्ली कोळी, सहा. आयुक्त सुहास गुप्ते व महापालिकेतील अन्य कर्मचारी वर्गानेही प्रदर्शनातील पुस्तके खरेदी करुन पुस्तक प्रदर्शनात आपला उत्स्‍फुर्त सहभाग दर्शविला.बुधवारी दुपार पर्यंत ५० हजार रक्कमेच्या सुमारे ५०० पुस्तकांची विक्री या प्रदर्शनात झाली. तर घनकचरा विभागाने सुरू केलेल्या “शुन्य कचरा मोहिमेतून  संकलित” झालेल्या कापड्यातुन महिला बचत गटाने शिवलेल्या कापडी पिशव्या देखील माफक दरात उपलब्ध झाल्याने कापडी पिशव्या विक्री तुन महिला बचत गटांना रोजगार सुर गवसल्याचे यानिमित्ताने दिसले.

238 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *