पेट्रोलियम बोर्ड, रिझर्व्ह बँकेची आगेकूच

४८ वी राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा
                                     

जळगाव : येथे सुरु असलेल्या ४८ व्या राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेतील सांघिक गटात महाराष्ट्राच्या पुरुष संघाला उपउपांत्य फेरीत तेलंगणाच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी चित केले. तर महाराष्ट्राच्या महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत व सारस्वत बँक, स्काय आय एम एफ व हिंदुस्थान पेट्रोलियम  सह पुरस्कृत या स्पर्धेत तामिळनाडूचा पुरुषांच्या संघाने  उपांत्य फेरीत प्रवेश केला खरा परंतु त्यांच्याही महिला संघाला तेलंगनाने अनपेक्षित पराभूत करून सर्वाना आश्यर्याचा धक्का दिला. पुरुष एकेरी व महिला एकेरी गटाच्या सामन्यांना संध्याकाळी सुरुवात झाली.


 आंतर राज्य व आंतर – संस्था पुरुष सांघिक गटाचे उपउपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे.  
आंतर – राज्य पुरुष सांघिक गट 

तेलंगना वि वि महाराष्ट्र २-१ निसार अहमद ( तेलंगना ) वि वि अभिजित त्रिपनकर ( महाराष्ट्र ) २५-७, २५-११आदित्य ( तेलंगना ) वि वि विकास धारिया ( महाराष्ट्र ) २४-१९, १७-२४, २४-१६वासिम / वी नरेश ( तेलंगण ) पराभूत वि राजेश गोहिल / निसार अहमद ०-२५, २-१८
तामिळनाडू वि वि बिहार ३-०अब्दुल असिफ ( तामिळनाडू ) वि वि नवीन कुमार आर्या ( बिहार ) २३-२१, १५-२३, ८-२३एस. गणेशन ( तामिळनाडू ) वि वि जलज कुमार ( बिहार ) १७-१४, १९-२०, २४-१३सी. भारतीदासन / अरुन कार्तिक( तामिळनाडू ) वि वि झुनून खान / महम्मद मुबस्सीर ( बिहार ) २२-९, २५-२ 
उत्तर प्रदेश विवि विदर्भ २-१महम्मद अरिफ ( उत्तर प्रदेश ) वि वि गुरुचरण तांबे ( विदर्भ ) २५-३, २३-५अब्दुल रेहमान ( उत्तर प्रदेश ) पराभूत  वि इर्शाद अहमद ( विदर्भ ) १६-२२, ०-२५उमर तन्वीर / महम्मद रेहान ( उत्तर प्रदेश ) वि वि गुल खान / मोहसीन मेश्राम ( विदर्भ ) १९-१५, २०-९

115 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *