बस आणि रिक्षाच्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू

नाशिकमध्ये घडला अपघात, ३४ जण झाले जखमी


नाशिक : नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोठी जीवित हानी झाली आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळल्यामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील विहिरीत असणारे सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात मृत झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसेच जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च एस टी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

89 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *